Sunday, 12 May 2013

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची साथ

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील  नऊ गावातील जनतेने तब्बल २१ किलो मीटर लांबीचा करंज नावाचा ओढा जिवंत आणि बारमाही वाहता करायचा संकल्प सोडला आहे.


रेणावी (ता.खानापूर) च्या डोंगर माथ्यावरून उगम पावलेला करंज ओढा, हजारो वर्षांपासून वाहणारा करंज ओढा, भांबर्डे तलावाला पाणी देणारा करंज ओढा, हा ओढा गेल्या २५ - ३० वर्षात आपले वाहणेच विसरला  होता. रेणावी, वासुंबे, भांबर्डे, गार्डी, घानवड आणि हिंगणगादे या येरळा नदी पर्यंतच्या प्रवासात अनेक ठिकाणी आपले पात्र त्याने आकसून घेतले आहे. या ओढ्याला मिळनाऱ्या सर्व छोट्या- मोठ्या ओहोळ आणि ओघळांची हि तशीच काहीशी अवस्था  झालेली आहे. या ओढ्याला उगमापासून ते संगमापर्यंत मोकळे करायचे आणि ओढ्या बरोबरच आपले जीवन ही समृद्ध करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल खानापूर तालुक्यातील तब्बल पाच गावातील लोकांनी टाकले आहे. अर्थात त्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची साथ लाभतेय …। 

No comments:

Post a Comment